वरसोली रामनाथ स्मशानभूमीला संरक्षक भिंत; आ. जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून वरसोली रामनाथ स्मशानभूमीला वॉल कंपाऊन साठी दिलेल्या कामाचे भूमिपूजन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
यावेळी विठोबा देवस्थान वरसोली ट्रस्टचे अध्यक्ष रमेश नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सद्स्य संजय पाटील, वरसोली सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य नगरसेवक अनिल चोपडा राकेश चौलकर, अजित माळी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर कामाचा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांनी केला त्याकामी वरसोली ग्रामपंचायतीने देखील त्याना सहकार्य केले.

Exit mobile version