| माथेरान | वार्ताहर |
माथेरान नगरपरिषदेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर सुयोग्य पद्धतीने उपचार केले जात नसून आपल्या कर्तव्यात नेहमीच कामचुकारपणा करून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची ज्या प्रकारे हेळसांड केली जात आहे. अशा अकार्यक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी याकामी डॉ. अजित रॉय यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी रत्नदीप प्रधान यांनी मुख्याधिकारी तथा, प्रशासक वैभव गारवे यांच्याकडे सुपूर्द केला होता. परंतु मुख्याधिकारी यांनी यावर काहीच उपाययोजना न केल्यामुळे (दि. 16) मे रोजी भारतीय कामगार सेना अध्यक्ष रत्नदीप प्रधान यांनी नगरपरिषदेच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे, त्यांच्या जोडीला सागर पाटील हे सुध्दा उपोषणाला बसले आहेत.
बी जे रुग्णालयातील वैदयकीय सेवा ही खंडित झाल्यामुळे रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच आता पर्यटक हंगाम सुरू होत असल्यामुळे पर्यटकांना देखील या वैद्यकीय सेवे अभावी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. रुग्णालयात एमबीबीएस ङॉ अजित रॉय आणि ङॉ रूपाली मिसाळ हे शासन नियुक्त डॉक्टर आहेत तर डॉ. पुजा केदारे बीएए स या कंत्राटी पद्धतीने नियुक्त होत्या त्यांनी दिनांक 5 मे.रोजी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त आहे. तर डॉ.रूपाली प्रशिक्षणासाठी आठ दिवसांपासून बाहेर गेल्या आहेत. सध्या ङॉ.अजित रॉय हे कार्यरत आहेत परंतू ते रुग्णांना योग्य ती सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. तिन्ही डॉक्टरांनी आप आपसात संगनमत करून परस्पर प्रत्येकी दोन दोन दिवसाच्या ड्युटी वाटून घेतल्या आहेत असे बोलले जाते. त्यामुळे तीन डॉक्टर नियुक्त असून सुद्धा प्रत्यक्षात मात्र रोज एकच डॉक्टर रुग्णालयात हजर असतो. म्हणून उपोषणाचे बसले असल्याने उपोषणकत्याने सांगितले. यावेळी उपोषण स्थळी उपोषण कर्त्यांना भेट देण्यासाठी माजी नगरसेवक प्रसाद सावंत, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, राजेश काळे,दिलीप सकपाळ, राजू कदम, परेंदु मोरे, कीर्ती मोरे, तन्वी दिघे यानी भेट दिली.