प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध; सारासाठी ग्रामस्थ रस्त्यावर

आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे

| पेण | प्रतिनिधी |

सर्पदंश झालेल्या सारा रमेश ठाकूर या बारा वर्षीय मुलीचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी (दि.29) पेण जिल्हा उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. तसेच, आरोग्य यंत्रणेच्या कारभाराचे धिंडवडे बाहेर काढले.

दि.26 रोजी जिते येथील सारास सर्पदंश झाला होता. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी समस्त जितेकरांनी तालुक्याला आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद आरोग्य खात्याच्या निष्काळजीचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पेणकर आज रस्त्यावर उतरले होते. पेण येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर समस्त पेणकारांनी आरोग्य प्रशासनाचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी सहभाग घेउन सारा हिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. अनेकांनी आपले मत माडतांना पेण उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य जितेच्या डॉक्टरांचा वारंवार उल्लेख करुन निष्कपाढा वाचून घटनाक्रम सांगितला.

साराच्या कुटुंबियांचे निवेदन घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. शीतल जोशी या स्वतः अलिबाग हून पेणमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत पेणच्या वैद्यकिय अधिक्षक संध्या रजपूत या उपस्थित होत्या. यावेळी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करुन निवेदनामध्ये इतर असणाऱ्या मागण्या संदर्भात बुधवारपर्यंत बैठक लावून त्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. डॉ. प्रिती पाटील यांना संध्याकाळपर्यंत निलंबन करण्यात येईल. डॉ. मिलिंद पाटील यांचा निलंबनाचा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठविला आहे, असे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी सांगितले आहे.

या ठिय्या आंदोनासाठी लिलाधर म्हात्रे, कैलास म्हात्रे, गोरख तांडेल, निलेश तांडेल, निखिल म्हात्रे, गजानन म्हात्रे, दिपेश ठाकूर, विशाल भोईर या तरुणांनी विशेष मेहनत करुन शिस्तबध्द पध्दतीने आंदोलन पार पाडले. तर, शांतता व सुवस्थेचा प्रन निर्माण होऊ नये म्हणून पेण पोलीस ठाण्याच्या व दादर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. तर, नायब तहसीलदार प्रसाद कोलकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी हे ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी लक्ष ठेऊन आंदोलन संपेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

Exit mobile version