मोहोपाड्यात शिवसेनेतर्फे निषेध

| रसायनी | वार्ताहर |

मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे, हा निकाल लागताच बुधवार (दि.10) मोहोपाडा शहरातील उध्दव ठाकरे शिवसेनेच्यावतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोहोपाडा शहर शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी करत व काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी उपसभापती गजानन मांडे यांनी मार्गदर्शन करताना सदर निकालाचा निषेध करून वासांबे जिल्हा परिषद व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्ष वाढीसाठी आणखीन जोरदार कामाला लागू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version