| रसायनी | वार्ताहर |
रसायनी वासांबे मोहोपाडा परिसरातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट घेतली, यावेळी उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रसायनीतील वासांबे मोहोपाडा परिसरातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते सकाळी नऊ वाजता बाजारपेठेतील शिवाजी चौकात जमून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविला. यानंतर मशाल पेटवून शिवसेना जिंदाबाद, उध्दव साहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषनाबाजी करुन मोहोपाडा बाजारपेठेतून मशाल फिरविण्यात आली.
यानंतर मशाल घेऊन मातोश्रीवर जाऊन आपला समर्थन असल्याचे सांगितले. तर यावेळी ठाकरेंनी जो जो शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करतो त्याला गाडून शिवसेना पुढे जाते असे वक्तव्य उध्दव ठाकरें यांनी केले. तर दसरा मेळाव्याची दखल जगाने घेतली. कॅनडा, ब्रिटनमध्ये मेळावा आपले भाषण इतरांना भाषांतर करून सांगितले.एका बाजूला भाड्याने आणलेली गर्दी होती, तर शिवतिर्थावर निष्ठावंत शिवसैनिक होते. अशी टीका यावेळी उध्दव ठाकरेंनी केली.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपले समर्थन असल्याचे सांगितले. शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश, प्रिती कडव, अजित सावंत, सद्गुणा पाटील, संतोष पांगत, अनिल खराडे, नीलम पाटील, भाग्यश्री पवार, अंजना भोईर, मीनाक्षी पाटील, मंगेश पाटील, शंकर भोईर, चिक्या भोईर आदी उपस्थित होते.