। पाली । वार्ताहर ।
बदलापूर शहरातील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, हा बंद असंविधानिक असल्याचे न्यायालयाने म्हटल्याने बंद मागे घेऊन महिला मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटने विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने पाली शहरात शनिवारी शिवाजी चौक येथे काळ्या फित बांधून तसेच काळे झेंडे फडकवित मूक निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी विष्णू पाटील, राजेंद्र राऊत, दिनेश चीले, विद्देश आचार्य, किशोर दिघे, रेशमा सुरावकर, किरण पिंपळे, नेत्रा पालांडे, वृषाली खरीवले, प्रवीण ओंबळे, रमेश खरीवळे, सोहम खंडागळे, राजा काटकर, प्रकाश ठोंबरे, किशोर चौधरी, पप्पू परबलकर आदि पदाधिकार्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.