| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या राज्य सरकारने मान्य न केल्याने दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक संतोष पवार व अनिल जाधव हे नगरपरिषद प्रशासन संचालनालय, बेलापूर, नवी मुंबई येथे सरकारला जागे करण्याकरिता आमरण उपोषणाला बसले आहेत. याउपोषणाला पाठिंबा देण्याकरीता बुधवारी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांरांनी नगरपरिषद कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा संघटना व मुरुड जंजिरा नगरपरिषद संघटना अध्यक्ष राकेश पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आरेकर, खजिनदार संजय वेटकोळी, परेश कुंभार, नंदकुमार आंबेतकर, मनोज पुलेकर, प्रशांत दिवेकर, सतेज निमकर, नितेश माळी, अनंता मोरे, राजु पाटील, सचिन सुभेदार, स्वप्नजा विरुकुड, अभिजित चांदोरकर, संजय भगत आदिंसह कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.







