। शिहू । वार्ताहर ।
यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे यांच्या मृत्यूचे पडसाद ठीकठिकाणी उमटत असून जनता पेटून उठली आहे. उरण येथे राहणार्या यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची विकृत बुद्धीने अमानुष हत्या करण्यात आली. तसेच, अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर मंदिरातील पुजार्यांनी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. या आपल्या बहिणींना न्याय मिळावा यासाठी शिहू विभागातील युवकांनी एकत्र येत रविवारी (दि.28) निषेध व्यक्त केला. या निषेध रॅलीत यशश्री शिंदे ना न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा बाजी करत शिहू फाटा ते शिहू अशी निषेध रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने युवक या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.







