महाड काँग्रेस कमेटीतर्फे निदर्शने

। महाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधामध्ये रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे संपुर्ण रायगड जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात आली. महाड शहर काँग्रेस, महाड तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस एनएसयुआय यांच्या तर्फे जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरुन आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शना खाली केंद्रातील मोदी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ महाडमध्ये जाहीर निदर्शने करण्यात आली. शहरांतील छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी सभेत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. महाड काँग्रेसतर्फे यावेळी शपथ घेण्यात आली. त्याच बरोबर काळ्या फिती लाऊन आणि काळे झेंडे दाखवुन मोती सरकारचा धिक्कार करण्यात आला.

या प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजु कोरपे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल येरुणकर, जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, शहर अध्यक्ष सुदेश कलमकर, पंचायत समिती सदस्या अपर्णा येरुणकर, अश्‍विनी घरटकर, नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रमोद महाडीक, सुभाष शिरशिवकर, प्रदिप मेहता आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version