महाड | प्रतिनिधी |
महाड पोलादपूरमध्ये नारायण राणे यांच्या विधानाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संपप्त शिवसैनिकांनी त्यांचा पुतळा जाळला, प्रतिमेला जोडे मारुन तीव्र निषेध व्यक्त केला. ना. राणे यांच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावरदेखील जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.
आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली ना. राणे यांचा निषेध व्यक्त करीत शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. या प्रसंगी महाड तालुका शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक, महाड शहर प्रमुख नितीन पावले, पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे, महाड नगरसेवक चेतन पोटफोडे, सुनिल आगरवाल, जि.प. सदस्य जितेंद्र सावंत, मनोज काळजकर, विजय सावंत, पद्माकर मोरे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.