उरण | वार्ताहर |
शहर शाखेसमोर केंद्रीय मंत्री नाराण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. त्यानंतर राणे यांच्या अटकेची मागणी उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली व त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुकासंपर्कप्रमुख जे.पी. म्हात्रे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उरण विधानसभा युवासेना अधिकारी नितेश पाटील, अवजड तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुकासंघटक के.एम.घरत, नंदकुमार पाटील, संजय मेश्राम, भारत पाटील, अशोक म्हात्रे, निलेश म्हात्रे, गणेश तांबोळी, यज्ञेश गोवारीम, निखिल पाटील, निरंतर सावंत, सम्राट घरत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.