पेडांबे प्रा.आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका प्रदान

। अलिबाग । वार्ताहर ।
पेडांबे प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील यांच्या हस्ते शासकीय योजनेतून रुग्णवहिका सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच या प्रसंगी प्रमोद ठाकूर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाचा नारळ फोडून तातडीने कामास सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पेडांबे येथे जि.प.सदस्या भावना पाटील आणि सभापती प्रमोद ठाकूर यांनी आरोग्य केंद्रास भेट देत दुरुस्तीचे तातडीने आदेश दिले व यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. यावेळी भावनाताई यांनी अ‍ॅम्ब्युलन्स प्रत्येक गावात फोनवर उपलब्ध झाली पाहिजे, तसेच डिझेल खर्च सामाजिक भावनेतून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी सहन करावा. तसेच जनता रात्रभर हॉस्पिटल समोर रांग लावून प्रत्येकाला लस मिळावी म्हणून कष्ट घेत होते. परंतु आता लसीचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु प्रतिसाद मिळत नाही यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच दिग्विजय पाटील, माजी सभापती कुंदा गावंड, पं.स.सदस्य प्रकाश पाटील, माजी उपसभापती अनिल पाटील, राजू गावंड, सिद्धिनाथ पाटील, मंगला ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर, सचिन ठाकूर, नंदू पाटील, अमोल पाटील, उदय पाटील, दयानंद म्हात्रे, गौतम पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version