। चिपळूण । प्रतिनिधी ।
सावर्डे बाजारपेठ येथे मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी येणार्या नागारिकांना विशेषत: महिला वर्गाला प्रचंड गैरसोय होत होती. याठिकाणी नागरिकांची मागणी व मुतारीची निकड लक्षात घेऊन माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सावर्डे बाजारपेठ येथे माहिला व पुरुष यांच्याकरिता उपलब्ध करून दिलेल्या स्वतंत्र प्रसाधनगृह व्यवस्थेचे लोकर्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
सावर्डे येथे मोठी बाजारपेठ व दर रविवारी भरणारा आठवडा बाजार व त्या अनुषंगाने याठिकाणी होणारी नागरिक, व्यापारी, ग्राहक यांची प्रचंड वर्दळ असे असतानाही मुतारीची व्यवस्था नसल्याने नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याबाबत सदानंद चव्हाण यांच्याजवळ चर्चा केली असता त्यांनी सदरची सोय उपलब्ध करून दिली. नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन मुतारी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सावर्डे बाजारपेठेत सार्वजनिक प्रसाधनगृहाची व्यवस्था
