सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती

| पनवेल | वार्ताहर |

गणेशोत्सवात सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने जागरूक नवी मुंबईकर अभियान राबवले जात आहे. या अभियानातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जात आहे. त्यानुसार खारघर येथे जनजागृती करण्यात आली.

खारघर सेक्टर अठरामधील श्री गणेश मित्र मंडळात याच अनुषंगाने सायबर गुन्हे व सुरक्षा तज्ज्ञ पोलिस अधिकारी डॉ. विशाल माने यांनी समाजमाध्यमांवर सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, फसवणूक झाल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधावा तसेच सायबर गुन्ह्यांबाबतचे कायदे, समाजमाध्यमांतून होणारे लैंगिक छळ, ऑनलाइन व्यवहारात होणारी फसवणूक आणि त्यापासून बचाव या सर्व गोष्टींची माहिती दिली. तसेच सायबर गुन्ह्यांच्या प्रकाराबाबत माहिती, आपली फसवणूक कशी होऊ शकते, मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, नोकरीबाबतचे खोटे संदेश ओळखणे, महिलांचे लैंगिक छळ करण्यासाठी गुन्हेगार कोणती प्रणाली वापरतात याबाबत माहिती दिली.

Exit mobile version