तंबाखू व्यसन विरोधी जनजागृती

| अलिबाग । वार्ताहर ।
जागतिक कर्करोग दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांमध्ये तंबाखू व्यसन विरोधी जनजागृती करीता पथनाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे पारितोषिक वितरण जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे डॉ. सुहास माने जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ रवींद्र रोकडे निवासी वैद्यकीय अधिकारी,डॉ जगताप, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय महाड यांच्या हस्ते तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला.
उत्कृष्ट पथनाट्य सादरीकरण करणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळे, कुरुळ,वेशवी, सागाव तळवली या शाळांच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समाज सेवक सुशील साईकर यांनी केले तर कर्करोग आणि तंबाखूच्या दुष्परिणाम विषयी माहिती डॉ. विकास पवार यांनी माहिती दिली.

Exit mobile version