| आगरदांडा | प्रतिनिधी |
आगामी निवडणुकांमध्ये व्होट व्हेरिफाइड पेपर ऐडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणामुळे नागरिकांना आपण कोणाला मतदान केले याची पक्की खात्री पटणार आहे. विश्वासाबरोबर बरोबर खात्री निवडणूक आयोगाने करून दिली आहे हा लोकशाहीतील उत्तम पर्याय असून लोकांनी यावर विश्वास ठेवावा असे मत मुरुड नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी राकेश पाटील यांनी मुरूड-जंजिरा नगरपरिषद कार्यालया प्रांगणात आलेल्या व्हॉनमध्ये जनजागृती आणलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रांची पाहणी करते वेळी बोलत होते.
यावेळी नरेंद्र नांदगावकर, सहाय्यक कर निरीक्षक नंदकुमार आंबेतकर, तलाठी रुपेश रेवसकर, ओंकार पोतदार, अभिजित चांदोरकर, अभि कारभारी, पल्लवी डोंगरीकर, अक्षता तुळसकर नंदु सुर्वे आदिसह नागरिक मान्यवर उपस्थित होते.