। अलिबाग । वार्ताहर ।
गजानन नाम सप्ताहानिमित्त शहाबाज येथे सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयातर्फे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून देवळातील सर्व भगिनींनी सुद्धा परिक्षा द्यायची इच्छा व्यक्त केली. त्यांना खुल्या गटात संधी देण्यात आली.
या स्पर्धेतील पहिल्या गटात हार्दिक तरे प्रथम, आराध्य पाटील द्वितीय तर, रिशीता पाटील हिने तृतीय क्रमांक पटाकवला आहे. दुसर्या गटात सिद्धी माळी प्रथम, प्रणय मोडखरकर द्वितीय तर, स्वराज पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर खुल्या महिला गटात रंजना पाटील यांनी प्रथम तर, प्रणाली जुईकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष मंगेश भगत, खजिनदार डॉ.विष्णू म्हात्रे, सचिव प्रविण पाटील व सदस्य प्रशांत पिंगळे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सदस्य प्रगती पाटील व प्रशांत पाटील यांनी केले. तर, कार्यक्रमाची सांगता सचिता पाटील, मनेष पाटील व रुपाली पाटील यांचे योगदान लाभून झाली.