। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर परिसरात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या व्यक्तीचे नाव अजय करन निशाद (45 रा.लोखंडीपाडा) असे असून या ठिकाणी एकटाच राहत होता व मिळेल ते काम करत होता. त्याच्या डोक्यावरील केस काळे, मिशी व दाढी बारीक, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 3 इंच आहे. तसेच, उजवा हात खांद्यापासून नाही. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे (27452333) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.