| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा-चौल शिवजयंती उत्सव कमिटीच्यावतीने रेवदंडा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही शिवजयंती शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी सुरेंद्र म्हात्रे यांचेसह अशोक नाईक, माजी उपसरपंच अजीत गुरव, अजीत मिसाळ, मारूती भगत, प्रसाद गोंधळी, सुरेंद्र गोंघळी, रमेश गोंधळी, ओमकार तांबडकर, मढवी, गाडे, माजी सरपंच रूपाली म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी मंडळी, कार्यकर्ते व महिलावर्ग यांची उपस्थिती होती. यादरम्यान रेवदंड्यातील युवकांनी रायगडहून शिवज्योत आणली, त्याचे स्वागत शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केले. त्यानंतर रेवदंडा आंग्रेनगर येथून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रेवदंडा पारनाका येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.







