कविता संग्रहाचे प्रकाशन

। नेरळ । प्रतिनिधी ।

शिक्षक, लेखक आणि कवी संघपाल वाठोरे यांच्या ‘अन देव निरुत्तर झाले’ या कविता संग्रहाचे प्रकाशन कवी अरुण म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सावळाराम जाधव, गिरीश कंटे, मल्हार पवार शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय शिंदे यांनी केले. तर, या कविता संग्रहातील काही कवितांचे वाचनासह शिक्षक सचिन भोईर आणि कवी वाठोरे यांच्या पत्नीकडून सादरीकरण केले.

Exit mobile version