| अलिबाग | प्रतिनिधी |
साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक ए.के. शेख यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा संपर्कप्रमुख एल.बी. पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अलिबाग शाखा अध्यक्षा व रायगड जिल्हा उपाध्यक्षा सुजाता पाटील, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, साहित्यिक रोहिदास पोटे, साहित्यिक सुभाष कटकदौंड, संपर्कप्रमुख संजय गुंजाळ, स्त्रीरोग तज्ञ व साहित्यिक डॉ. चंद्रकांत वाजे, साहित्य संपदा संस्थापक व साहित्यिक वैभव धनावडे, पूनम धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. रमेश धनावडे यांचे असेच काहीतरी हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक वेगळा प्रकार आहे. सहज सोपे वाटणारे हे लिखाण चिंतन करण्याजोगे आहे. मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून अशी अनेक पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत.