। चिपळूण । प्रतिनिधी ।
सावर्डे-दुर्गेवाडी मार्गावर काजचे वाकण येथे दुचाकी कठड्यावर धडकून वृद्धाचा मृत्यू झाला. मनोज नीलकंठ पोंक्षे (वय 72, रा. पाग जोशीआळी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात सोमवारी (दि. 5) सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडला. मनोज पोंक्षे हे त्यांच्या स्कूटरवरून सावर्डेकडून दुर्गेवाडीकडे जात होते. काजचे वाकण येथील तीव्र उतारावर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला जोरदार धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.