माणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकापर्ण

| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव पोलीस ठाणे येथे रविवार. दि. 19 मार्च रोजी रुग्णवाहिकेचे लोकापर्ण पार पडले.शांती निवास ओल्ड एज होम यांच्या सौजन्याने देण्यात आलेली ही रुग्णवाहिका माणगाव पो.नि. राजेंद्र पाटील व माणगाव पोलीस तसेच माणगाव तालुक्यात कार्यरत असलेली साळुंखे रेस्क्यू टीम यांच्याकडे असणार आहे. यामुळे अपघात, पूरपरिस्थिती, दरड आदी आपत्कालीन काळात तात्काळ घटनास्थळी पोहोचून या रुग्णवाहिकेमार्फत सहाय्य करण्यास मदत होणार आहे.

या रुग्णवाहिकेमध्ये आपत्कालीन काळात रेस्क्यूसाठी लागणारी सर्व साधनसामग्री व साहित्य उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा फायदा अनेक नागरिकांना होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासमवेत पो.नि. राजेंद्र पाटील, स.पो.नि. सतीश आस्वर, पो. उपनिरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड, सूर्यकांत भोजकर, मगर, पोलीस अधिकरी व कर्मचारी, माणगाव तालुका साळुंखे रेस्क्यू टीम अध्यक्ष रवींद्र मोरे व साळुंखे रेस्क्यू टीम सदस्य आदी उपस्थित होते.

Exit mobile version