| पनवेल | वार्ताहर |
शहरातील तक्का रोड येथील महावीर फर्निचर दुकान समोर चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून चोर स्कुटीवरून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी सांडगे ह्या नेटसेटच्या स्टडी करिता आंबेडकर भवन येथील अभ्यासिकेमध्ये पायी जात असताना महावीर फर्निचर दुकान, तक्का रोड या ठिकाणी पाठीमागून स्कुटीवरून आलेल्या अनोळखी इसमाने अश्विनी यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे 11 ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र व ओप्पो मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून घेऊन गेला.