नुकसानग्रस्त शेतीचे केले पंचनामे

कृषी अधिकार्‍यांसह सरपंच शेताच्या बांधावर
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावात महापूरच्या पाण्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे.हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना गावात बोलावून घेत शेताच्या बांधावर नेऊन पंचनामे करून घेतले आहेत.
कर्जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी होऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढून तालुक्यातील अनेक गावांत आणि शहरात पाणी शिरल्याने महापूर आला होता.घरात पाणी शिरून अन्न-धान्यांची देखील नासाडी झाली होती. यात भातशेतात पाणी घुसून शेत दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे शेतकर्‍यांची शेतीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांची शेतकर्‍यांना भातपिकाच्या नुकसानीची नुकसाभरपाई मिळावी यासाठी हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला बोराडे यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून त्या सर्व कृषी अधिकार्‍यांना शेताच्या बांधावर नेऊन पंचनामा करून घेतले आहेत.
यावेळी सरपंच बोराडे यांच्यासह कृषी सहाय्यक संगीता पाटील, सुवर्णा शिंदे, हालीवली गावातील शेतकरी बळीराम बोराडे, रामदास बोराडे, कल्पेश बोराडे, प्रवीण बोराडे, रमेश शिंदे, हरिश्‍चंद्र जाधव, रंभाजी शिंदे, सुरेश बोराडे आदींनी शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली.

Exit mobile version