तब्बल 8 आयएएस अधिकार्‍यांना शिक्षा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आंध्रप्रदेश हाय कोर्टाने गुरुवारी आठ आयएएस अधिकार्‍यांना शिक्षा सुनावली आहे. या अधिकार्‍यांच्या विरोधात कोर्टाची अवमानना करण्याचा आरोप होता. त्याबद्दल या अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधातील या प्रकरणामध्ये सुनावणी करताना आंध्र प्रदेश हायकोर्टाने अधिकार्‍यांना दोषी ठरवून त्यांना दोन आठवड्यांसाठी तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयानंतर अधिकार्‍यांनी हायकोर्टाची माफी मागितली आहे. या माफीनंतर हायकोर्टाने जरा नरम पवित्र घेत आपला निर्णय थोडा सौम्य केला.

Exit mobile version