विनयभंगप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

| माणगाव | प्रतिनिधी |

मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षेचा महत्त्वपूर्ण निर्णय माणगाव सत्र न्यायाधीशांनी दिला आहे. ही घटना कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलवहाळ गावाच्या हद्दीत गावदेवी मंदिराजवळ दि. 8 जानेवारी 2021 रोजी घडली होती.

या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी हे एकाच गावातील राहणारे असून, पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना आरोपीने तिला पाठीमागून दोन्ही हाताने घट्ट मिठी मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पो. नि. एस.ए. जाधव यांनी करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी मा. अति. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश, माणगाव-रायगड येथे झाली. या गुन्ह्यात पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरली. या खटल्यामध्ये अति. शासकीय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्यावतीने काम पाहिले. याप्रकरणी पैरवी अधिकारी पो.स.ई. दिनेश आघाव, पो.ह. शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, छाया कोपनर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. मा. विशेष व सत्र न्यायाधीश यू.टी. पोळ यांनी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपींना दोषी ठरवून दि. 9 जुलै रोजी पॉक्सो अंतर्गत ती वर्ष सक्तमजुरी व रू. 500/- दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास व पॉक्सो अंतर्गत 5 वर्ष सक्तमजुरी व रू. 500/- दंड व दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Exit mobile version