ऋषभ पंतवर दंडात्मक कारवाई

| विशाखापट्टणम | वृत्‍तसंस्था |

आयपीएल स्पर्धेत रविवार (दि.31) मार्च रोजी तेरावा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली संघात पार पडला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात दिल्लीने 20 धावांनी विजय मिळवला. मात्र, या विजयानंतरही दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version