। कर्जत । प्रतिनिधी ।
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नाही. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. त्यात ओमीक्राँन व्हेरीयंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून नागरीकांना मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरी नागरिक बाजार पेठेत विना मास्क फिरत आहेत, अशांवर कर्जत नगरपरिषद दंडात्मक कारवाई करत आहे.
कर्जत बाजारपेठेत मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात तीन पथके बनविण्यात आली आहेत. ही पथके विनामास्क फिरणार्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. शासनाने नियम ठरवून दिले आहेत त्याचे पालन करा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे.







