। नेरळ । प्रतिनिधी ।
2011 मध्ये मृत झालेली व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन बोगस जमीन मालक दाखवून खोटे खरेदी खत यांच्या आधारे जमिनीची खरेदी करणार्या तरुणाला अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील माणगाव येथील आठ गुंठे क्षेत्र असलेली जमीन याच भागातील आसल येथे राहणारा संदीप राजाराम गायकवाड या तरुणाने बोगस मालकाकडून खरेदी केली.
आरोपीला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील जमिनीची बोगस विक्री करण्याचे प्रकार दर महिन्यात उघड होत असून त्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. मुंबई येथील राहणारे महंमद अफाक इसाक अन्सारी यांच्या वडिलांच्या नावे कर्जत तालुक्यातील मौजे माणगाव ग्रामपंचायत हद्दीत आठ गुंठे जमीन आहे. सदर जमीन सर्व्हे नंबर 83/4 ही जमीन ज्यांचे नावे आहे ते मूळ मालक 2011 साली मृत झाले आहेत. जमिनीचे मयत मालक यांच्या जमीन मालकाच्या जागी बोगस मालक यांनी आपणच जमिनीचे खरे मालक असल्याचे कर्जत तालुक्यातील आसल येथे राहणारे संदीप गायकवाड यांनी विकत घेतली. 26 फेब्रुवारी 2021 रोजी संदीप राजाराम गायकवाड यांनी सदर जमीनीची कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे जागेचे खरेदी व्यवहार पूर्ण केले. हा व्यवहार पूर्ण होताच जमिनीची नोंद करण्यात येत असताना या जमिनीचे प्रकरणी मूळ मालक यांनी संदीप गायकवाड यांनी आपली फसवणूक केल्याने त्या जमिनीचे मूळ मालक महंमद अफाक इसाक अन्सारी यांनी 12 में 2021 रोजी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांनी माहिती घेऊन तपासक अधिकारी श्रीकांत काळे यांना योग्य सूचना दिल्
या गुन्ह्याबाबत नेरळ पोलिसांनी संदीप राजाराम गायकवाड यास अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी यांचा शोध नेरळ पोलीस करीत आहेत, मूळ मालक यांचा शोध लागेपर्यंत पोलीस तपास सुरू राहणार असून या तपासकामी सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश गिरी तसेच अविनाश वाघमारे आणि नेरळ पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.