अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. सर्वत्र पाणीचं पाणी झालेले आहे. याचाच फटका मुळे ग्रामस्थांना सुद्धा बसला आहे, भरपूर बांधवांच्या घरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. याची पाहणी करण्याकरिता आज चित्रलेखा पाटील यांनी मुळे गावाला भेट दिली. यावेळी काही बांधवांना ताईंनी त्वरित मदत केली, ज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशांना सुद्धा लागेल ती मदत दिली जाईल असे सुद्धा सांगितले.