आदिवासी वस्तीत शिरला अजगर

। चिरनेर । वार्ताहर ।

भक्ष्याच्या शोधात विंधणे आदिवासी वस्तीत शिरलेल्या 11 फुट लांबीच्या अजगराला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य राजेश पाटील यांनी शिताफीने पकडले. त्यानंतर त्याला नैसर्गिक आवासात सोडून देण्यात आले.

विंधणे-उरण येथील आदिवासी वस्तीत बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास एक इंडियन पायथॉन जातीचा अजगर कोंबड्यांचा पाठलाग करताना दिसला. 11 फुुुटी लांंबीच्या अजगराला पाहून घाबरलेल्या आदिवासींनी सर्पमित्र राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. सर्पमित्र राजेश पाटील यांनी अजगराला शिताफीने पकडले. याची खबर लगेचच वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजगराला नैसर्गिक आवासात सोडून देण्यात आले.

Exit mobile version