भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत आर अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकले आहे. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 712 बळी घेतले आहेत. तर, हरभजन सिंगने आपल्या कारकीर्दीत 711 बळी घेतले आहेत. यासह अश्विनने दुसरे स्थान पटकावले असून, तो हरभजनच्या पुढे गेला आहे.
आर अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी आणि भारतासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला आव्हान दिले आहे, तर हरभजन सिंगलाही मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विनने दुसऱ्या कसोटीत एकूण तीन बळी घेतले आहेत. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंगला मागे टाकले असून, भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे 956
रविचंद्रन अश्विन 712
हरभजन सिंग 711
कपिल देव 687
झहीर खान 610