र.ना. राऊत विद्यालयाचा निकाल 96.82 टक्के

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धनमधील रवींद्र ना राऊत विद्यालयचा निकाल 96.82 टक्के लागला आहे. दूर्वा रवींद्र गोसावी ही विद्यार्थिनी 91.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. आदिती निलेश बाक्कर 91 टक्के मिळवून द्वितीय, तर शर्वरी श्रीकांत केळकर 90.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. यश राम नांदीवकर 90 टक्के, अमेय राजेंद्र करणेकर 87.80 टक्के हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष अनिल भुसाणे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष जितेंद्र सातनाक, प्राचार्य जगताप यांनी देखील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version