मेजवानी हॉटेलजवळ राडा

अलिबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाला. दोघांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना मेजवानी हॉटेल परिसर ते नेहुली पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश गुरव असे या जखमीचे नाव आहे. हा इसम शुक्रवारी सायंकाळी मेजवानी हॉटेलमध्ये जेवण करीत होता. दरम्यान, महेंद्र पाटील याने त्याला विनाकारण शिवीगाळी केली. हा वाद विकोपाला गेला. महेंद्र पाटील यांच्यासह योगेश पाटील, प्रफुल्ल पाटील यांनी रुपेश याला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुपेश व रमेश गुरव असे दोघेजण दुचाकीवरून जखमी अवस्थेत घरी निघाले. नेहुली येथील पुलाजवळ आल्यावर त्यांनी पुन्हा रुपेश आणि रमेश यांना मारहाण केली. लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात महेंद्रसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version