रघुनाथ पाटील यांच्या कुटुंबियांची केली विचारपूस
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ढवर येथील शेकापचे ज्येेष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेणारे हरहुन्नरी, मनमिळाऊ सर्व क्षेत्रात हिरिरीने सहभाग घेणारे रघुनाथ विष्णू पाटील यांचे सर्पदंशाने निधन झाले. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी गुरुवारी ढवर येथे जाऊन रघुनाथ पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली.
रायगड जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले रघुनाथ पाटील हे नूतन हनुमान क्रीडा मंडळ ढवर या संघाचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक क्रीडांगणे गाजवून मंडळाला अनेक बक्षिसे मिळवून दिली. ते राजकारणात सक्रिय होते. कबड्डी खेळा सोबत ते बैलगाडी व भजन प्रेमीदेखील होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रघुनाथ पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पाटील कुटुंबीय आणि ढवर ग्रामस्थ उपस्थित होते.