पुणे | प्रतिनिधी |
ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात पुण्यातल्या वैंकुठ स्मशानभूमी इथं विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे छगन भुजबळ, रघुनाथ माशेलकर, दिलीप वळसे पाटील आदींनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर अंत्यसंस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि बाबा रामदेव हे देखील उपस्थित होते.
राहूल बजाज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
