राहुल मुंडके नवे प्रांताधिकारी ; संजय भोये नवे गटविकास अधिकारी

पनवेल | वार्ताहर |
पनवेलच्या प्रांताधिकारीपदी राहुल मुंडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी राहुल मुंडके हे बोरिवली, मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी होते. दत्तात्रेय नवले यांची मेट्रो सेंटर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी राहुल मुंडके नवे प्रांताधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ) पदी संजय भोये यांनी पदभार स्वीकारला आहे. भोये यापूर्वी खालापूर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी होते. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version