16 जणांविरुद्ध गुन्हा
। पुणे । प्रतिनिधी ।
कात्रज भागात जुगार अड्डयावर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकला. यात मोबाइल संच, जुगार खेळण्याचे साहित्य, रोकड असा एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच याप्रकरणी पोलिसांनी जुगार अड्डाचालकासह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आंबेगाव परिसरात जांभुळवाडी भागात एका इमारतीत किशोर सातपुते, साहिल साठी जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून पत्ते, १६ मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबई जुगार अधिनियमान्वये पोलिसांनी जुगार अड्डाचालकासह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.