कोलाडमध्ये मटका जुगारावर धाड

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली असून कल्याण मटका जुगार खेळविणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की दिनांक 27 सप्टेंबर रोजी मौजे वरसगाव गावच्या हद्दीत पद्मावती नगर तलाठी ऑफिस लगतच्या वळणावर डांबरी रोडवर आरोपी संदेश जाधव वय 24 वर्षे रा. सिद्धाई अपार्टमेंट रोहा मूळ गाव माणगाव हा या ठिकाणी स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका जुगार हारजितीचा खेळ खेळविताना आढळून आला सदर इसमाकडू शंभर चिट्ठयांचा बंच प्रत्येक चिठ्ठीवर लिहिलेले कल्याण असे मजकूर आढळून आले.

सदर इसमावर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. एस. ए. विघ्ने व कोलाड पोलीस पथक करीत आहेत.

Exit mobile version