पालीत मटका अड्ड्यावर छापा

दिड लाखांच्या मालासह दोघेजण ताब्यात
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली बस स्थानकाजवळील शिवसेना भवन कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असणार्‍या गल्लीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर मंगळवारी (ता.28) पाली पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 1,67,300 किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम आणि 2 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल अतुल चंदनशिवे व पोलीस नाईक शेडगे हे बीट मार्शल पेट्रोलिंग डयुटीकरीता हजर होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांना या ठिकाणी अवैध मटका धंदा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत मिळाली. त्यानुसार सदर बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाने चंदनशिवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस नाईक म्हात्रे व शेडगे यांनी छापा टाकला. यावेळी पोलीसांनी धावत जावून दोन संशयितांना पकडले. यावेळी त्यांच्याकडे एक पावती बुक, पावत्या इतर साहित्य रोख रक्कम व स्कुटी मोटारसायकल मिळून आल्या आहेत.

Exit mobile version