जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 14 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 32 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर दिवसभरात 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 14, पनवेल ग्रामीण 3, खालापूर 4, कर्जत 1, पेण 2, अलिबाग 2, मुरुड 1, माणगाव 1, रोहा 1, सुधागड 1 व महाड 2 असे 32 रुग्ण आढळले. उरण, तळा, श्रीवर्धन, म्हसळा व पोलादपूर या पाच तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 037 झाली आहे. यापैकी 2 लाख 08 हजार 645 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 681 वर गेला आहे. सद्यस्थितीत 711 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.