269 कोरोना मुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सोमवारी रायगड जिल्ह्यातील 10 तालुक्यामध्ये 179 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 269 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 86, पनवेल ग्रामीण 41, उरण 4, खालापूर 16, पेण 7, अलिबाग 10, मुरुड 3, माणगाव 1, रोहा 7, महाड 2 तर पोलादपूर 2 असे 179 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 113, पनवेल ग्रामीण 69, उरण 12, खालापूर 5, कर्जत 8, पेण 30, अलिबाग 18, मुरुड 5, माणगाव 1, तळा 1, रोहा 1, श्रीवर्धन 4, महाड 1 आणि पोलादपूर 1 अशा एकूण 269 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 19 हजार 208 झाली आहे. यापैकी 2 लाख 13 हजार 213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 701 इतका आहे. सद्यस्थितीत 1 हजार 294 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.