रायगड जिल्ह्यात 33 रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू

7 तालुक्यात नवीन रुग्ण नाही, तर 66 रुग्ण कोरोनामुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 22 फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 16, पनवेल ग्रामीण 3, उरण 1, खालापूर 1, पेण 5, अलिबाग 3, माणगाव 2, रोहा 1, महाड 1 असे 33 रुग्ण आढळले. कर्जत, मुरुड, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या 7 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 373 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 334 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 691 वर गेला आहे. सद्यस्थितीत 348 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version