जिल्ह्यात 7 तालुक्यात नवे रुग्ण नाही

115 नवे कोरोना रुग्ण; 5 जणांचा मृत्यू तर 166 झाले कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी नव्याने 108 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 203 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत तर उरण, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, म्हसळा आणि पोलादपूर या सात तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मंगळवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 40, पनवेल ग्रामीण 6, खालापूर 5, कर्जत 4, पेण 21, अलिबाग 25, रोहा 7, श्रीवर्धन 1 महाड 6 असे एकूण 115 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर उरण, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, म्हसळा आणि पोलादपूर या सात तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच अलिबाग तालुक्यात तीन तर कर्जत, पेण तालुक्यात प्रत्येकी एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 63 हजार 134 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 57 हजार 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 860 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version