6 जणांचा मृत्यू तर 144 झाले कोरोनामुक्त ; जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी नव्याने 146 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 144 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत तर तळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर या तीन तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गुरुवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 43, पनवेल ग्रामीण 14, उरण 3, खालापूर 2, कर्जत 8, पेण 16, अलिबाग 31, मुरुड 2, माणगाव 5, रोहा 11, सुधागड 2, म्हसळा 1, महाड 8 असे एकूण 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर तळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर या तीन तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. उरण तालुक्यात दोन तर पनवेल ग्रामीण, कर्जत, पेण, आणि म्हसळा या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 63 हजार 408 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 57 हजार 463 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 117 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 828 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.