रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव (आबा) जगताप यांचे निधन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाडचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेसचे रायगड जिल्हा माणिकराव जगताप यांचे मध्यरात्री मुंबई येथे निधन झाले. मागील काही दिवस आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर महाड येथे आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी कॅप्टन जगताप बंगला,नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार आहे.

Exit mobile version