रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंची एमसीएच्या चाचणी शिबिरासाठी निवड

| अलिबाग | क्रीडा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे तीन युवा खेळाडू कौस्तुभ म्हात्रे (पेण) तेवीस वर्षाखालील मुलांच्या गटात, अमेय पाटील (उरण) एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात व कुमारी रोशनी पारधी(महाड) हिची महाराष्ट्राच्या महिलांच्या वरिष्ठ संघाच्या निवड चाचणी कॅम्पसाठी निवड करण्यात आली आहे.

रायगडच्या तिन्ही गुणवान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड चाचणी शिबिरासाठी स्थान मिळवले आहे. निवड चाचणी शिबिर पुणे येथे होणार असून, सदरच्या शिबिरातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या मुख्य संघात केली जाणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक यांच्या सह सर्व पदाधिकारी, सदस्य व क्रिकेट प्रेमी लोकांनी रायगडच्या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले असून भविष्यात त्यांनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवून रायगड जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल करावे अशी आशा व्यक्त केली आहे. गेल्या काही काळापासून रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघात होत असल्याने जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Exit mobile version