रायगड जिल्हा कुमारी संघ जाहीर

। गडब ।वार्ताहर ।

सांगली येथे होणार्‍या 51व्या महाराष्ट्र् राज्य अंजिक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबडी असो. ने मुलींचा कबडी संघ जाहीर केला आहे. या संघाचा सराव शिबीर नुकताच पेझारी येथील बाल युवक मंडळाच्या क्रिडांगणावर संपन्न झाला आहे.तसेच, रायगड जिल्ह्याच्या कुमारी गटाच्या कबड्डी संघाने राज्य अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेत चागली कामगिरी करावी, असे जिल्हा कबड्डी असो.चे सहकार्यवाह जे.जे. पाटील यांनी खेळांडुना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.

खेळांडुनी सराव शिबिरात कसुन सराव केला असुन रायगडचा संघ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल, असे संघाचे प्रशिक्षक जनार्दन पाटील यांनी सांगितले आहे. तर, राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी या संघात अनुभवी खेळाडू असून सांघिक खेळ करुन या स्पर्धेत विजय संपादन करु, असे कर्णधार हर्षदा पराठे हिने सांगितले आहे. रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघात निवड झालेल्या खेळांडुचे रायगड जिल्हा कबडी असो.च्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

कुमारी गट कबड्डी संघ
हर्षदा पराठे (कर्णधार), पायल निगडे (उपकर्णधार), अन्यना निर्मल, श्रावणी पाटील, एकता पाटील, आदिती पालवणकर, अंकीता घारे, वैष्णवी पाटील, रुतिका पाटील, दिपिका गाडे, सावली गोरे, तन्वी पाटील. संघ प्रशिक्षकः जनार्दन पाटील, संघव्यवस्थापीकाः रुणाली मोकल.
Exit mobile version