रायगड जिल्हा पॉवर लिफ्टींग निवड चाचणीचे निकाल जाहीर

।अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा पॉवर लिफ्टींग संघटनेच्या वतीने रविवारी (दि.24)खोपोली येथे निवड चाचणी स्पर्धा सब जुनिअर मुले व मुली यांची घेण्यात आली. ही निवड चाचणी के.एम.सी. कॉलेड येथे शिवछत्रपती पुरस्कार मारुती अडकर यांच्या अपस्थितीत पार पडली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लूक अ‍ॅट मी प्रटीन दुकानाचे मालक रोशन निलदे हे उपस्थित होते.
या निवड चाचणी स्पर्धेत स्ट्राँग गर्ल श्रृती मोरे सब ज्यु., अमृता भगत ज्यु. या मानकरी झाल्या. तसेच स्ट्राँग बॉईज मयांक पवार (सब जु.), शुभम कांगले ज्यु. या किताबाचे मानकरी ठरले.
यावेळी रायगड पॉवर लिफ्टींगचे गिरीश वेदक, राष्ट्रीय खेळाडू माधव पंडीत, राहूल गजरमल, अरुण पाटकर उपस्थित होते. सदर स्पर्धेसाठी विनायक पाटील, डॉ.जयवंत माने, पवन पिंगळे, संतोष गावडे, महेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचे निकाल-
निवड चाचणी सबजुनिअर (मुली) 43 किलो वजनी गट सुहानी गावडे, सारा कांबळे, 47 किलो वजनी गट श्रृती मोरे, 61 किलो वजनी गट साक्षी जैन. निवड चाचणी सबज्युुनिअर (मुले) 53 किलो वेदांत पिंगळे, अनिरुद्ध डोके, 66 किलो विवेक शेळके, 83 किलो यश कळमकर, 93 किलो मयांक पवार, यश गायकवाड, निकर्ष जाधव, 105 किलो मृणाल पाटील.
निवड चाचणी ज्युनिअर (मुली) 43 किलो अमृता भगत, 52 किलो, वैष्णवी चव्हाण, 57 किलो अक्षता भोसले. निवड चाचणी ज्युनिअर (मुले) 53 किलो कुणाल पिंगळे, करण पाटील, 59 किलो हितेश पडवळ, आहार लोगडे, निशांत शिंदे, 66 किलो प्रफूल्ल जोशी, विवेक शेळके, ऋृषिकेश डोंगरे, 74 किलो सुरज पाटील, 83 किलो सुरज महाडीक, रोनीत देशमुख, जय ठाकूर, 93 किलो निकर्ष जाधव, किरण म्हात्रे, 105 किलो शुभम कांगले, मृणाल पाटील, सुरज धीमाल, 120 किलो वजनी गट प्रतीक पोळ, 120 किलो वरील सर्वर पाटील.

Exit mobile version